मुंबई - बॉलिवूड अभिनेता इम्रान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहात आहेत. अलिकडेच अवंतिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्ट वाचल्यानंतर लक्षात येते की, दोघांमध्ये फारसे बरे चाललेले नाही. या पोस्टमुळे सर्वत्र चर्चेला उधाण आल्यानंतर तिने ही पोस्ट आता डिलीट केली आहे.
अवंतिका मलिकने पोस्ट केलेल्या लिखानामध्ये मॉर्गन हार्पर निकोलस यांच्या एक कोटचा वापर केला आहे. तिने लिहिलंय, ''कधी कधी तुम्हाला निघून जायचे असते. तुम्ही ज्याच्यावर उर्जा खर्च करीत असता त्याकडे लक्ष देणे आवश्यक असते. तुम्ही थांबू शकाल असे वाटू शकते. ती गोष्ट तुम्ही पुन्हा मिळवू शकता, असे असतानाही तुम्हाला निर्धाराने निर्णय घ्यावा लागतो. तिथून अशा ठिकाणी निघून जावे जिथे तुमचे स्वागत होईल.''