नवी दिल्ली- हॉलिवूड स्टार टॉम हॉलंड याचा 'अनचार्टेड' हा चित्रपट भारतात प्रदर्शनासाठी तयार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करताना त्याने आपले भारताविषयीचे प्रेम बोलून दाखवले. त्याला ताजमहाल पाहायची इच्छा असून भारतात फिरायला आणि इथे शुटिंग करण्यासाठीही त्याला आवडेल, असे तो म्हणाला.
आग्रा येथील ताजमहाल पाहण्याची इच्छा बोलून दाखवताना तो म्हणाला, "मी माझा नवीन चित्रपट घेऊन येत आहे आणि मला आशा आहे की भारतीय प्रेक्षकांनाही तो आवडेल. मला माझ्या भारतीय चाहत्यांना भेटण्यासाठी भारतात यायला आवडेल किंवा कदाचित एखाद्या दिवशी तिथे चित्रपटाचे शूटिंगही करायला आवडेल. मला भारताचा प्रत्येक भाग पाहायला आवडेल. भारतातील ताजमहालचाही यात समावेश आहे. तिथली प्रत्येक गोष्ट अतिशय सुंदर आहे. मला भारतभर फिरण्याची खूप इच्छा आहे."