मुंबई - मेलबर्न येथे 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०१९' पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. तर, अभिनेत्री तब्बुला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले.
तब्बुने 'अंधाधुन' तसेच अजय देवगनसोबत 'दे दे प्यार दे' चित्रपटात भूमिका साकारली होती. तर, 'अंधाधुन'चे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपति यालाही सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे.
८ ऑगस्ट पासून मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टव्हलची सुरुवात झाली आहे. १७ ऑगस्ट पर्यंत हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.