मुंबई - सिनेसृष्टीतील प्रतिष्ठीत मानला जाणारा 'आयफा पुरस्कार २०१९' चा सोहळा मुंबईत रंगला. या पुरस्कार सोहळ्यात 'राझी' चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्री आलिया भट्ट हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर 'पद्मावत' चित्रपटासाठी रणवीर सिंगला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला आयुष्मान खुरानाच्या 'अंधाधून' चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. इशान खट्टरला 'धडक' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट डेब्यू तर, सारा अली खानला केदारनाथ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणीय पुरस्कार मिळाला आहे.
वाचा संपूर्ण यादी -
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - राजी
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - श्रीराम राघवन (अंधाधून)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणवीर सिंग (पद्मावत)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (राजी)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - विकी कौशल (संजू)
- सर्वोत्कृष्ट पदार्पणीय पुरस्कार - ईशान खट्टर (धडक)
- सर्वोत्कृष्ट पदार्पणीय पुरस्कार - सारा अली खान (केदारनाथ)
- सर्वोत्कृष्ट कथा - श्रीराम राघवन, पुजा लढा सुरती, अरिजीत बिस्वास, योगेश चंदेकर आणि हेमंत राव (अंधाधून)
- सर्वोत्कृष्ट लिरिक्स - अमिताभ भट्टाचार्य (धडक)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - हर्षदीप कौर आणि विभा सराफ ( दिलबरो-राजी)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - अरिजीत सिंग ( ऐ वतन - राजी)
-
सिनेसृष्टीतील योगदान - सरोज खान आणि सय्यद इश्तियाक अहमह