मुबंई- मेलबर्न येथे इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या पुरस्काराची घोषणा झाली आहे. यामध्ये किंग खान शाहरुखला सिनेसृष्टीतील उत्कृष्ट कलाकार म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तर, 'गली बॉय' चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय' चित्रपटाला अलिकडेच ६६ व्या राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानीत करण्यात आले आहे. आता इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्येही या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.