मुंबई - भारत सरकारच्या वतीने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. कंगना रानावत, करण जोहर, एकता कपूर आणि अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. सध्या अदनान सामीला मिळालेला पुरस्कार चर्चेचा विषय ठरलाय. अशावेळी ख्यातनाम अभिनेता अन्नू कपूर यांनी दिलेली प्रतिक्रियादेखील चर्चेत आहे.
''पद्मश्री फक्त योग्य आणि पात्र लोकांनाच मिळते, माझ्यासारख्या अयोग्य आणि नालायकाला नाही'' - अन्नू कपूर यांना पद्मश्री पुरस्कार मिळायला हवा
हरहुन्नरी अभिनेता अन्नू कपूर यांना पद्मश्री पुरस्कार मिळायला हवा, असे मत एका युजरने व्यक्त केले. त्याला उत्तर देताना पद्मश्रीसाठी आपण अयोग्य आणि नालायक असल्याची अन्नू कपूर यांनी व्यक्त केलीली प्रतिक्रिया उपरोधिक आहे.
पद्मश्री पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर एका युजरने अन्नू कपूर यांना पद्मश्री पुरस्कार मिळायला हवा होता, असे ट्विट केले होते. या ट्विटला उत्तर देताना अन्नू कपूर यांनी म्हटले, की ''धन्यवाद भाई, परंतु पुरस्कार फक्त योग्य आणि पात्र लोकांनाच दिला जातो, माझ्यासारख्या अयोग्य आणि नालायकाला नाही. तरीही तुम्ही माझी आठवण काढलीत त्याबद्दल धन्यवाद.''
अन्नू कपूर यांनी व्यक्त केलीली प्रतिक्रिया उपरोधिक आहे. अन्नू कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केलंय. भारतातील अनेक भाषेतील लोकगिते त्यांना मुखोद्गत आहेत. गेली २७ वर्षे ते नाटक, टीव्ही आणि सिनेमाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. अशावेळी या हरहुन्नरी अभिनेत्याला पद्मश्री मिळाली अशी अपेक्षा चाहत्यांनी ठेवली तर त्यात गैर काही नाही. सध्या त्यांनी केलेली ट्विट लक्ष वेधणारे आहे.
TAGGED:
Annu Kapoor on social media