मुंबई - हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला 'सुपर ३०' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांना पाहायला मिळाला. चाहते बऱ्याच काळापासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता हृतिकने या चित्रपटाचे आणखी एक नवं पोस्टर शेअर केलं आहे.
'बस छलांग लगाने की देर है', हृतिकने शेअर केलं 'सुपर ३०' चं नवं पोस्टर - social media
येत्या १२ जुलैला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सत्य कथेवर आधारित आहे. हृतिक या चित्रपटात आनंद कुमार या गणित तज्ज्ञाची भूमिका साकारणार आहे.
'बस छलांग लगाने की देर है', हृतिकने शेअर केलं 'सुपर ३०' चं नवं पोस्टर
येत्या १२ जुलैला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सत्य कथेवर आधारित आहे. हृतिक या चित्रपटात आनंद कुमार या गणित तज्ज्ञाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. आनंद कुमार आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे.
'प्रतिभा ओर साधन दोनो तयार है, बस छलांग लगाने की देर है', असे कॅप्शन हृतिकने शेअर केलेल्या फोटोवर दिले आहे.