मुंबई -हृतिक रोषनचा 'सुपर ३०' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाची दिर्घकाळापासून चाहत्यांना प्रतिक्षा आहे. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यानंतर चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रियादेखील पाहायला मिळत आहेत. अशातच हृतिकने सेटवरचा आणखी एक फोटो चाहत्यांसाठी शेअर केला. या फोटोमध्ये हृतिकचे 'सुपर ३०' विद्यार्थीदेखील पाहायला मिळत आहेत.
'हे' आहेत हृतिकचे 'सुपर ३०', शेअर केला सेटवरचा आणखी एक फोटो - aanand kumar
हृतिक या चित्रपटामध्ये गणितज्ञ आनंद कुमार यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. बऱ्याच दिवसानंतर हृतिक पडद्यावर झळकणार असल्यामुळे चाहत्यांनाही या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.

हृतिकने हा फोटो शेअर करुन यावर खास कॅप्शनही दिले आहे. 'माझी भूमिका शिक्षकाची होती. मात्र, सेटवर मी विद्यार्थीच होतो. हे आहेत माझे 'सुपर ३०'. त्यांची तपस्या, स्वभाव आणि उत्साह यांमधून मी बरंच काही शिकलो', असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हृतिक या चित्रपटामध्ये गणितज्ञ आनंद कुमार यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. बऱ्याच दिवसानंतर हृतिक पडद्यावर झळकणार असल्यामुळे चाहत्यांनाही या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. १२ जुलैला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिकसोबत मृणाल ठाकूर, नंदिश सिंग, अमित सध आणि पंकज त्रिपाठी हे कलाकारदेखील झळकणार आहेत.