मुंबई - अभिनेता ह्रतिक रोशनचा सुपर ३० हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. देशभर सर्वत्र प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिलाय. या चित्रपटाने शंभरीच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. चित्रपटाची कथा आणि गाणी लोकप्रिय झाली आहेत. अशातच या चित्रपटातील गाण्यावर ह्रतिकची आई डान्स करताना दिसत आहे.
पाहा, बॉलिवूडच्या 'सुपर'हिरोच्या सुपरमॉमचा डान्स - Hritik Roshan mother
रोशनची आई पिंकी रोशन यांनी सुपर ३० चित्रपटाच्या गाण्यावर डान्स केला आहे. हा डान्स व्हिडिओ ह्रतिकने शेअर केला असून त्याला उत्तम प्रतिक्रिया मिळत आहेत.
पिंकी रोशन
हा व्हिडिओ जिममधील आहे. ह्रतिकच्या आई पिंकी रोशन व्यायाम करताना दिसत आहेत. पार्श्वसंगीतामध्ये सुपर ३० चित्रपटातील 'जुगराफिया' गाणे सुरू असून त्यावर त्या थिरकताना दिसत आहेत.
ह्रतिकने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्याच्या चाहत्यांनी यावर भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ह्रतिकला सुपर ३० चित्रपटाने यश संपादन करुन दिल्यामुळे तो अतिशय समाधानी आहे. त्याचा आगामी वॉर हा चित्रपट २ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.