महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हृतिक रोशनच्या वाढदिवशी एक्स पत्नी सुझानने शेअर केली खास पोस्ट - Hritik Roshan latest news

अलिकडेच हृतिकने सुझान आणि मुलांसोबत नव्या वर्षाचे सेलिब्रेशन केले. सुझानने त्यांच्या ट्रीपचे काही फोटो देखील पोस्ट केले आहेत.

Hritik Roshan Ex wife sussanne khan share post on hritik's birthday
हृतिक रोशनच्या वाढदिवशी एक्स पत्नी सुझानने शेअर केली खास पोस्ट

By

Published : Jan 10, 2020, 1:24 PM IST

मुंबई- हृतिक रोशन आणि सुझान खान दोघेही घटस्फोटानंतरही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. बऱ्याचदा दोघेही आपल्या मुलांबरोबर एकत्र वेळ घालवताना दिसतात. आज हृतिकचा ४६ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त सुझानने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

'माझ्या आयुष्यातील अतुल्य व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा', असे लिहून सुझानने त्यांची मुले रेहान आणि रिधान यांच्यासोबत हृतिक रोशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अलिकडेच हृतिकने सुझान आणि मुलांसोबत नव्या वर्षाचे सेलिब्रेशन केले. सुझानने त्यांच्या ट्रीपचे काही फोटो देखील पोस्ट केले आहेत.
हृतिक आणि सुझान दोघे एकमेकांपासून जरी वेगळे झाले असले, तरीही आपल्या मुलांसाठी ते नेहमी एकत्र येतात. घटस्फोटानंतरही त्यांच्यात मैत्रीचे नाते आहे.

हेही वाचा -हॅप्पी बर्थडे हृतिक रोशन : डान्स मुव्ह्जचा जादूगर

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, हृतिकने मागच्या वर्षी 'सुपर ३०' आणि 'वॉर' हे दोन सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details