मुंबई -अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची जुगलबंदी असलेला 'वॉर' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दोघेही एकमेकांविरोधात भिडताना दिसणार आहेत. दोघेही बॉलिवूडचे अॅक्शन हिरो आहेत. विशेष म्हणजे टायगर हा हृतिकला त्याचा प्रेरणास्त्रोत मानतो. त्यामुळे टायगर आणि हृतिक यांची जुगलबंदी नेमकी कशी असणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
'वॉर' चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. टायगर आणि हृतिक यांनी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हटके फंडा वापरताना दिसले. प्रमोशनदरम्यान त्यांनी घातलेले टी-शर्ट्स हे आकर्षक ठरले. टायगरने हृतिकच्या 'क्रिश' चित्रपटातील लूक असलेलं टी - शर्ट घातलं होतं. तर, हृतिकनं टायगरचा मास्क असलेलं टी-शर्ट परिधान केलं होतं.
हेही वाचा -'एमी अवार्ड्स २०१९': 'सेक्रेड गेम्स' आणि 'लस्ट स्टोरीज'ला मिळालं नॉमिनेशन