मुंबई -बॉलिवूडचा हँडसम हंक ह्रतिक रोशन आणि यामी गौतम यांचा 'काबिल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाला होता. या चित्रपटात ह्रतिक आणि यामी दोघांनीही अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. आता हा चित्रपट चीनमध्येदेखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे चीनी पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.
ह्रतिक, यामीचा 'काबिल' चीनमध्ये होणार प्रदर्शित, पाहा पोस्टर - box office
चीनी बॉक्स ऑफिसवर आजवर भारतीय चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 'दंगल', 'बजरंगी भाईजान', 'सिक्रेट सुपरस्टार', 'हिंदी मिडियम', 'हिचकी', 'मॉम', 'अंधाधून' यांसारख्या चित्रपटांनी चीनी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या पुढे कमाई केली आहे.
![ह्रतिक, यामीचा 'काबिल' चीनमध्ये होणार प्रदर्शित, पाहा पोस्टर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3276305-459-3276305-1557817893419.jpg)
चीनी बॉक्स ऑफिसवर आजवर भारतीय चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 'दंगल', 'बजरंगी भाईजान', 'सिक्रेट सुपरस्टार', 'हिंदी मिडियम', 'हिचकी', 'मॉम', 'अंधाधून' यांसारख्या चित्रपटांनी चीनी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या पुढे कमाई केली आहे. आता 'काबिल' चित्रपटही चीनमध्ये जाण्यासाठी सज्ज झाला आहे. चीनमध्ये प्रदर्शित होणारा ह्रतिकचा हा पहिलाच चित्रपट आहे.
'काबिल' चित्रपटाने भारतात १०३.८४ कोटींची कमाई केली होती. शाहरुख खानच्या 'रईस' चित्रपटाला या चित्रपटाने जोरदार टक्कर दिली होती. संजय गुप्ता यांनी 'काबिल' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.