मुंबई -अभिनेता हृतिक रोशनच्या 'सुपर-३०' चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेमध्ये सतत काही ना काही अडथळे येत होते. मात्र, अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुहूर्त मिळाला आहे. हा चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित होणार आहे.
...अखेर हृतिकच्या 'सुपर ३०'ला मिळाली रिलीज डेट, 'या' दिवशी होणार प्रदर्शित - jabriya jodi
हृतिकच्या 'सुपर-३०' चित्रपटाची 'जबरिया जोडी' या चित्रपटाशी टक्कर होऊ शकते. 'सुपर-३०' हा चित्रपट या वर्षी जानेवारी महिन्यातच प्रदर्शित होणार होता. मात्र, २५ जानेवारीला कंगनाचा 'मणिकर्णिका' चित्रपटासोबत टक्कर होऊ नये, म्हणून या चित्रपटाची तारीख बदलण्यात आली.
![...अखेर हृतिकच्या 'सुपर ३०'ला मिळाली रिलीज डेट, 'या' दिवशी होणार प्रदर्शित](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3383816-881-3383816-1558800908541.jpg)
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. हृतिकच्या 'सुपर-३०' चित्रपटाची 'जबरिया जोडी' या चित्रपटाशी टक्कर होऊ शकते. 'सुपर-३०' हा चित्रपट या वर्षी जानेवारी महिन्यातच प्रदर्शित होणार होता. मात्र, २५ जानेवारीला कंगनाचा 'मणिकर्णिका' चित्रपटासोबत टक्कर होऊ नये, म्हणून या चित्रपटाची तारीख बदलण्यात आली. त्यानंतर पुन्हा हा चित्रपट २६ जुलैला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यावेळीही कंगना आणि राजकुमार रावचा 'मेंटल है क्या' हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली.
आता हा चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पटनाच्या गणीततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात मृणाल ठाकुर, अमीत संध आणि नंदिश संधु हे कलाकारही झळकणार आहेत.