मुंबई - बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा 'वॉर' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. दमदार ट्रेलर, थरारक अॅक्शन आणि दोन सुपरहिट अॅक्शन हिरो एकत्र येणार असल्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे. या चित्रपटातील दोन गाणीही प्रदर्शित झाली आहेत. तर, टायगर आणि हृतिकची जुगलबंदी असलेलं 'जय जय शिवशंकर' हे गाणं सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहे.
'वॉर' चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. मात्र, टायगर आणि हृतिक दोघेही एकत्र या चित्रपटाचं प्रमोशन करू शकणार नाही. यामागे निर्मात्यांची एक अट आहे. ती म्हणजे चित्रपटात ज्याप्रमाणे हृतिक आणि टायगर एकमेकांविरोधात लढताना दिसणार आहेत. हाच भाग प्रमोशन दरम्यानही टिकवून ठेवायचा आहे. त्यामुळे दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं प्रमोशन करणार आहेत.
हेही वाचा -टायगर आणि हृतिकची जुगलबंदी असलेलं 'वॉर'चं पहिलं गाणं प्रदर्शित