मुंबई -हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ दोघेही आपल्या डान्स आणि अॅक्शनसाठी ओळखले जातात. त्यांच्या 'वॉर' चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
हृतिक विरुद्ध टायगर: 'वॉर'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित - टायगर श्रॉफ
हृतिक आणि टायगर एकत्र येणार म्हटल्यावर चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता आहे. 'वॉर' हा एक अॅक्शनपट असल्याची झलक टीझरमध्ये पाहायला मिळाली होती.
हृतिक विरुद्ध टायगर: 'वॉर'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित
हृतिक आणि टायगर एकत्र येणार म्हटल्यावर चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता आहे. हा एक अॅक्शनपट असल्याची झलक टीझरमध्ये पाहायला मिळाली होती. हृतिकला टायगर आपला प्रेरणास्रोत मानतो. मात्र, चित्रपटात दोघेही एकमेकांना टक्कर देताना पाहायला मिळतील.
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हिंदी, तमीळ आणि तेलुगू भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. २ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.