मुंबईः शहर आणि समाजाच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या लोकांच्या सुरक्षततेचा विचार अभिनेता ह्रतिक रोशनने केला आहे. यासाठी एक पाऊल पुढे टाकत त्याने बृहन्मुंबई महानगर पालिका (बीएमसी) कर्माचाऱ्यांसाठी चांगल्या दर्जाचे मास्क खरेदी केले आहेत.
ह्रतिकने ट्विट करीत ही माहिती दिली. त्याने लिहिले आहे, ''अशा प्रसंगी आपला समाज आणि शहर याच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्यांचा विचार करणे आवश्यक आहे. मी आपल्या बीएमसी आणि इतर देखभाल करणाऱ्या लोकांसाठी एन ९५ आणि एफएफपी ३ मास्क खरेदी केले आहेत.''
ह्रतिक रोशनने महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांचे सेवेची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्तके ले आहेत. त्याने पुढे लिहिलंय, '@AUThackeray यांनी अशा कठीण प्रसंगी महाराष्ट्र राज्याची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आभार. आपल्या क्षमतेनुसार मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. @mybmc #कोरोनावायरसआउटब्रेक #स्टेहोमस्टेसेफ.'
ह्रतिक रोशन 'वॉर' या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत शेवटचा झळकला होता. सध्या कोरोना व्हायरसमुळे स्वतःच्या घरात एकांतात राहात आहे. त्याच्या घरी त्याची एक्स वाईफ आणि मुले परतली आहेत. बॉलिवूडचे अनेक कलाकार सेल्फ-आइसोलेशन, सेल्फ-क्वारंटाइन आणि सोशल डिस्टन्सिंगमध्ये राहात आहेत. यात बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, कैटरीना कैफ, प्रियंका चोपड़ा, शिल्पा शेट्टी यांचा समावेश आहे.