मुंबई - 'मारक्कर-लायन ऑफ द अरेबियन सी' या भव्य चित्रपटाचा हिंदी भाषेतील ट्रेलर रिलीज झाला आहे. मूळ मल्याळम भाषेत असणाऱ्या या चित्रपटात सुपरस्टार मोहनलाल मुख्य भूमिकेत आहे.
डोळ्यात न मावणारी अतिभव्य दृष्य या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसतात. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट एक युद्धपट आहे. अरबी समुद्राचा अनभिषक्त सम्राट असलेल्या कुंजली मारक्कर या योध्याची ही कथा आहे.
अनेक हिट चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. अंथोनी पेरुम्बवूर निर्माता असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आशीर्वाद सिनेमाज या बॅनरने केली आहे.
'मारक्कर-लायन ऑफ द अरेबियन सी' या चित्रपटात मोहनलाल यांच्यासह प्रणव मोहनलाल, अर्जुन, सुनिल शेट्टी, प्रभू, मंजू वारियर, सुहासिनी, किर्ती सुरेश, कल्याणी प्रियदर्शन, फैजील, सिद्दीकी, अशोक सेल्वन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
'मारक्कर-लायन ऑफ द अरेबियन सी' हा चित्रपट २६ मार्च २०२०ला देशभर वेगवेगळ्या भाषेत रिलीज होणार आहे.