मुंबई -बॉलिवूडमध्ये आपल्या संगीत आणि गायकीने प्रेक्षकांवर छाप पाडणारा हिमेश रेशमीया आता अभिनयामध्ये सक्रीय झाला आहे. त्याचे आत्तापर्यंत १० चित्रपट प्रदर्शित झाले आहे. ३१ जानेवारीला त्याचा 'हॅप्पी, हार्डी अँन्ड हिर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात त्याची दुहेरी भूमिका पाहायला मिळत आहे. या चित्रपटानंतर आता त्याच्या आगामी चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली आहे.
हिमेश रेशमीया आता 'नमस्ते रोम' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट प्रेमकथेवरील सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटासाठी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबत एकत्र येऊन हिमेश संगीत देणार आहे. तर, राजेश सेठी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
हेही वाचा -Public Review : हिमेश रेशमीयाचा 'हॅप्पी, हार्डी, अँड हिर' सिनेमागृहात दाखल, जाणून घ्या प्रतिक्रिया