मुंबई - बॉलिवूडमध्ये आजकाल स्टारकिड्सला घेऊन चित्रपट बनवण्याचा ट्रेन्ड सुरू आहे. बरेच स्टारकिड्स सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. आता मिथुन चक्रवर्तीचा मुलगा नमाशी हा देखील बॉलिवूड एन्ट्रीसाठी सज्ज झाला आहे. दिग्दर्शक राजकुमार संतोशी यांच्या आगामी 'बॅड बॉय' या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
मिथुन चक्रवर्तीच्या मुलासाठी हिमेश रेशमीया देणार संगीत - Sajid Qureshi
संगीत दिग्दर्शक तसेच आघाडीचा गायक असलेला हिमेश रेशमीया हा 'बॅड बॉय' चित्रपटाला संगीत देणार आहे. हा चित्रपट रोमॅन्टिक-कॉमेडी असणार आहे. निर्माते साजीद कुरेशी यांची मुलगी अमरीन ही नमाशीसोबत झळकणार आहे. या चित्रपटातून दोघेही बॉलिवूड पदार्पण करत आहेत.

लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातून देखील दोन स्टारकिड्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जावेद जाफरी यांचा मुलगा मिजान आणि संजय लीला भन्साळींच्या बहिणीची मुलगी शर्मिन सेहगल या दोघांची जोडी 'मलाल' चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे यांच्यासोबतच आणखी दोन स्टारकिड्स बॉलिवूड पदार्पण करत असल्याने त्यांच्यापैकी कोणाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
'बॅड बॉय' चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होईल.