मुबंई -बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहलीने अलिकडेच दुबईत स्काय डायव्हिंग केली आहे. आकाशाला गवसणी घालण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, हेच स्वप्न सत्यात उतरल्यावर त्याचा आनंद वेगळाच असतो. हिमांशने शेअर केलेल्या या व्हिडिओतही स्काय डायव्हिंग पूर्ण झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे पाहायला मिळतो.
'तुमचा कंम्फर्ट झोन संपल्यावरच खरं आयुष्य सुरू होतं, असं कॅप्शन देत त्याने त्याच्या स्काय डायव्हिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा माझं आयुष्य बदलवणारा अनुभव असल्याचंही त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. हिमांश कोहली पूर्वीही बऱ्याच कलाकारांनी स्काय डायव्हिंगचा आनंद लूटला आहे.
हेही वाचा -काजोल आणि राणी मुखर्जीने एकत्र साजरी केली दुर्गाअष्टमी