मुंबई - पुढच्या जन्मी लग्न करशील का? असे विचारणाऱ्या चाहत्याला अभिनेत्री रविना टंडनने तितक्या मिश्किलपणे उत्तर दिले आहे. रविनाने बुधवारी इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर केला होता. सुंदर पर्वतावरील या फोटोवर अनेक चाहत्यांनी आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बर्फ आच्छादित वातावरणातील रविनाच्या फोटोवर कॉमेंट करताना एका चाहत्याने लिहिले, ''रवीना मॅडम, तुम्ही पुढच्या जन्मी माझ्याशी लग्न कराल का?''
याला उत्तर देताना रवीनाने लिहिले, ''माफ करा, मी सात जन्मासाठी आधीच बुक्ड आहे.''
इतर चाहत्यांनी रविनाच्या फोटोला प्रतिसाद देताना प्रेमाचा वर्षाव केला आहे.
एक चाहत्याने लिहिलंय, ''जेव्हा मी दरवेळा पाहतो, तेव्हा मी तुमच्या पुन्हा प्रेमात पडतो.''
तर एकाने लिहिलंय, ''तुम्ही नेहमीच क्वीन आहात. लव्ह यू.''
रवीनाच्या फॅनक्लबमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. रॅपर बादशाही तिचा चाहता आहे. एका प्रश्न-उत्तरात बादशाने रवीना टंडन आपली क्रश असल्याचे म्हटले होते.
रवीना टंडनचा विवाह बिझनेसमन अनिल थडानी यांच्याशी २००४मध्ये झाला आहे. त्यांना राशा ही मुलगी आणि रणबिरवर्धन हा मुलगा, अशी दोन अपत्य आहेत. त्यांनी छाया आणि पूजा या दोन मुली दत्तक घेतल्या आहेत.
चित्रपटांचा विचार करता अनेक वर्षे सिनेमाच्या पडद्यापासून दूर गेलेली रवीना 'केजीएफ २' या चित्रपटातून कमबॅक करीत आहे. 'केजीएफ १' या कन्नड चित्रपटाचा हा सीक्वल चित्रपट आहे.