महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'द बिग बुल' चित्रपटातील इलियाना डिक्रूझचे झळकले पहिले पोस्टर - इलियाना डिक्रूझचे आकर्षक पोस्टर

अभिषेक बच्चन आणि इलियाना डिक्रूझ स्टारर 'द बिग बुल' चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर झळकणार आहेत. अभिषेकनंतर निर्मात्यांनी इलियानाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले आहे.

The Big Bull
'बिग बुल'

By

Published : Aug 18, 2020, 2:41 PM IST

मुंबई -आगामी ‘द बिग बुल’ या आगामी क्राईम-थ्रिलर चित्रपटाच्या निर्मात्यांनी इलियाना डिक्रूझचे आकर्षक पोस्टर प्रसिध्द केले आहे.

पोस्टरमध्ये इलियानाने चांदीच्या ऑक्सिडायझिंग इयर रिंग्जसह ब्लॅक सलवार सूट परिधान केला आहे आणि आपले केस अंबाड्यामध्ये बांधले आहेत. चष्म्यातील तिचा हा लूक करारी वाटत आहे.

इलियाना डिक्रूझने इंस्टाग्रामवर पोस्टर पोस्ट करून तिच्या पहिल्या लूकचे अनावरण केले. "बिग बुल: ज्या माणसाने भारतात स्वप्नांची विक्री केली, या जगाचा भाग होण्यासाठी मी उत्सूक आहे, असे तिने म्हटलंय.

दरम्यान, चित्रपटाचे मुख्य पात्र- अभिषेक बच्चन आणि निर्माता अजय देवगण यांनीही आपापल्या ट्विटर हँडल्सवर पोस्टर ट्विट केले आहे.

हेही वाचा - संजय दत्तचे आगामी चित्रपट आणि त्यांची सद्यस्थिती

यापूर्वी अभिषेक बच्चनने घोषणा केली होती की, हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपी मल्टिप्लेक्सवर प्रदर्शित होईल.

हॉटस्टार व्हीआयपी वर व्हर्च्युअल संवादादरम्यान अभिनेता अभिषेक म्हणाला की, बोल बच्चननंतर मी दुसर्‍यांदा अजय देवगणसोबत काम करत आहे आणि 'द बिग बुल' चे पोस्टरदेखील लाँच झाले आहे. चित्रपटाचे कथानक सांगत त्यांनी सांगितले होते की ही कथा 80 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 90 च्या दशकातील आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'द बिग बुल' चित्रपट स्टॉकब्रोकर हर्शद मेहताच्या जीवनावर आधारित आहे. द बिग बुल' चित्रपटात फायनांशिअल मार्केटची १९९० ते २००० या काळातील कथा दाखवण्यात येणार आहे.कुक्कू गुलाटी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. तर, अजय देवगन फिल्म्सच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. अभिषेकसोबत अभिनेत्री इलियाना डिक्रुज मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details