मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा सिनेमा 'दिल बेचारा'चा बहुप्रतीक्षित ट्रेलर आज रिलीज करण्यात आला. अत्यंत ह्रदयस्पर्शी कथा असलेला हा चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी एका बाजूला आनंद देणारा तर दुसऱ्या बाजूला डोळ्यात आश्रू आणणारा आहे. डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. सुशांतचा मित्र आणि कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाबडा याने या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. विशेष म्हणजे या ओटीटी प्लेटफॉर्मचे सबस्क्रीबशन घेणाऱ्या आणि न घेणाऱ्या दोन्ही प्रेक्षकांना सुशांतचा हा अखेरचा सिनेमा पाहता येणार आहे.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करून या ट्रेलरची माहिती दिली आहे. सुशांतसिंह राजपूत आणि नवोदित संजना संघी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.