जोधपुर - अभिनेता सलमान खानचे काळवीट हत्या प्रकरण न्यायालयात आता अंतिम स्थितीपर्यंत पोहोचले आहे. या प्रकरणाची न्यायालयात आज तारीख होती. मात्र न्यायालयाने याला स्थगिती दिली असून पुढील तारखेला यावर सुनावणी होईल.
काळवीट हत्या प्रकरणी सलमानला या तारखेला होऊ शकते शिक्षा ? - Salman Khan
सलमान खानच्या काळवीट हत्या प्रकरणाची सुनावणी स्थगित झाली आहे... पुढील सुनावणी ४ जुलैला होईल..जोधपुर जिल्हा सत्र न्यायालयात सलमानला रहावे लागणार हजर...
सलमान खानचे काळवीट हत्या प्रकरण
काळवीट हत्येमुळे सलमान आणि त्याचे सहकलाकार अडचणीत आले होते. या प्रकरणी सलमानला कधी दिलासा मिळतोय तर कधी पुन्हा यावर सुनावणी होते. आता जोधपुर जिल्हा आणि सत्र न्यायालयात याची सुनावणी येत्या ४ जुलैला होईल. यावेळी सलमान तारखेला हजर राहावे लागणार आहे. या कचाट्यातून तो सलमात बाहेर पडतो की गजाआड जातो याचा निर्णय न्यायालयात होईल. दरम्यान काही काळासाठी तरी त्याला दिलासा मिळालाय.