हैदराबाद - बॉलीवूड दिवा करिना कपूर खान ही अभिनय आणि फीटनेससाठी प्रसिध्द आहे. खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातही तिने आपले फॅशन स्टेंटमेंट कायम राखले आहे. तिचा कपडे आणि फॅशन सेन्स उत्कृष्ट आहे. आपल्या दोन मुलांच्या गरोदरपणानंतरही तिने स्वत:ला चांगले ठेवले आहे. आज बेबोचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिला ईटीव्ही भारतकडून शुभेच्छा..
HBD Kareena Kapoor: पाहा बेबोचे आतापर्यंतचे स्टायलिश लूक - करिना कपूरचा वाढदिवस
बॉलीवूड दिवा करिना कपूर खान ही अभिनय आणि फीटनेससाठी प्रसिध्द आहे. खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातही तिने आपले फॅशन स्टेंटमेंट कायम राखले आहे. आज बेबोचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिला ईटीव्ही भारतकडून शुभेच्छा.....
या बॉलीवूड अभिनेत्रीने काळाुसार स्वत:ला अपडेट ठेवले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून करिना कपूर लहान केस ठेवणे पसंत करते. तिच्या प्रत्येक लूकचे चाहते अनुकरण करतात. एका डान्स रिअॅलिटी शो मध्ये परिक्षक म्हणून असलेल्या करिनाने घातलेला पिवळ्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर केलेली केशभूषा ही चर्चेचा विषय राहिली होती. गूड न्यूज या चित्रपटाचे दिल्लीमध्ये प्रमोशन करतानाचा तिचा लूक गाजला होता. ईली साब यांनी करिनाची स्टायलिंग केली होती. नंतर एका डान्स रिअॅलिटी शोसाठी तिने घातलेली पोनीटेल तिच्या स्टाईलला सूट करत होती. थोडेसे केस कुरळे करून तिने वेणी घातली होती. ती आता आगामी आमिर खानच्या 'लाला सिंग चढ्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. यात ती महत्वाच्या भूमिकेत असून एकता कपूर याची निर्मिती करणार आहे.
हेही वाचा -पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा प्रियकरासह गोव्यात अपघात