महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘हॅशटॅग प्रेम’मधून आजच्या युगातील प्रेमाच्या गुलाबी रंगाची उधळण!

निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी माऊली फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली ‘हॅशटॅग प्रेम’ची निर्मिती केली असून राजेश बाळकृष्ण जाधव यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.​ निखिल कटारे यांनी या सिनेमाची कथा आणि पटकथा लिहिली आहे.

'Hashtag Prem'
‘हॅशटॅग प्रेम

By

Published : Mar 2, 2021, 3:09 PM IST

मुंबई - इंटरनेटचे विश्व साऱ्या जगात पसरले असून ते जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. त्यासंदर्भातील भाषाही रोजच्या बोली भाषेत मिसळून गेलीय. बोलीभाषेतही आता सोशल मीडियावरील शब्द आणि चिन्हांचा वापर होऊ लागला आहे, त्यामुळे कित्येकदा जणू काही प्रेमालाही सोशल मीडियाचा स्पर्श झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातीलच एक शब्द जो हल्ली सर्रास वापरला जातो तो म्हणजे ‘हॅशटॅग’. हा शब्द वापरून एका मराठी सिनेमाचे शीर्षक बनलंय, ‘हॅशटॅग प्रेम’. आजच्या फेसबुक आणि ट्विटरच्या जमान्यात तरूणाईची भाषाही काहीशी चिन्हांकीत झाली आहे. याचंच प्रतिबिंब आता रूपेरी पडद्यावरही उमटणार आहे, ‘हॅशटॅग प्रेम’ हे अनोखं टायटल असलेल्या मराठी सिनेमातून.

‘हॅशटॅग प्रेम
नुकतेच या चित्रपटाच्या चित्रझलकीचे अनावरण झाले. मिताली मयेकर आणि सुयश टिळक ही नवी कोरी जोडी आणि त्यांची केमिस्ट्री रसिकांना सिनेमागृहांपर्यंत खेचून आणण्यासाठी पुरेशी असून् हीच या सिनेमाची मुख्य खासियत आहे. याची झलक ‘हॅशटॅग प्रेम’च्या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. शीर्षकावरूनच ‘हॅशटॅग प्रेम’ ही प्रेमकथा असल्याचं सहज लक्षात येतं. यासोबतच यात आजच्या युगातील प्रेमाच्या गुलाबी रंगाची उधळण करण्यात आली असल्याचीही जाणीव होते. मिताली आणि सुयश या दोघांमधील मैत्री आणि प्रेमाचं नातं अधोरेखित करत हा ट्रेलर कथानकातील इतरही घटनांवर प्रकाश टाकतो.
‘हॅशटॅग प्रेम
​निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी माऊली फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली ‘हॅशटॅग प्रेम’ची निर्मिती केली असून राजेश बाळकृष्ण जाधव यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.​ निखिल कटारे यांनी या सिनेमाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. सिनेमातील गीतांनी प्रविण कुवर यांचे संगीत लाभले असून गायक-संगीतकार रोहित राऊतनं पार्श्वसंगीत दिलं आहे. तसेच कला दिग्दर्शनाची बाजू केशव ठाकूर यांनी सांभाळली असून सिनेमॅटोग्राफी राजा फडतरे यांची आहे. वितरक समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल एंटरटेनमेंटची ही प्रस्तुती आहे. ​‘हॅशटॅग प्रेम’ ही सुद्धा एक प्रेमकथा असली तरी यात प्रेमाचे विविध पैलू उलगडून दाखवण्यात आले आहेत. प्रेमासोबतच इतर नातेसंबंधांचाही विचार या सिनेमात करण्यात आला आहे. आजच्या तरूणाईसोबतच संपूर्ण कुटुंबासाठी या सिनेमात एक महत्त्वपूर्ण संदेश दडलेला असल्याचं दिग्दर्शक राजेश बाळकृष्ण जाधव यांनी स्पष्ट केलं. या सिनेमात मुख्य भूमिकेत एका फ्रेश जोडीची आवश्यकता असल्यानं सुयश आणि मितालीची निवड करण्यात आल्याचं दिग्दर्शक राजेश बाळकृष्ण जाधव यांचं म्हणणं आहे. दोघांनीही अफलातून काम केलं आहे. निर्माते म्हणून मराठी सिनेमा बनवताना आपलीही काहीतरी जबाबदारी असल्याची जाणीव मनात ठेवून ‘हॅशटॅग प्रेम’ तयार करण्यात आल्याचं निर्माते अनिल गोविंद पाटील यांचं मत आहे. केवळ प्रेमकथा न देता त्या जोडीला आजच्या पिढीपर्यंत एक मेसेज पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. निर्मितीमूल्यांमध्ये कुठेही काटकसर न करता एक दर्जेदार कलाकृती बनवण्याच्या विचारातून ‘हॅशटॅग प्रेम’ची निर्मिती केल्याचंही पाटील म्हणाले.​‘हॅशटॅग प्रेम’ येत्या १९ मार्च ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details