मुंबई- आजचा होळीचा एक असा सण आहे ज्या दिवशी आपल्या प्रियजनांसोबत रंग उधळण्याचा आनंद संपूच नये असे वाटत असते. अशा या आनंदी प्रसंगी सदाबहार बॉलीवूड गाण्यांवर नृत्य केल्याशिवाय होळीचा कोणताही उत्सव पूर्ण होत नाही.
ही काही होळीची खास गाणी आहेत जी तुम्ही तुमच्या सणाच्या प्लेलिस्टमध्ये जरुर असली पाहिजेत.
रंग बरसे भीगे चुनर वाली: मेगास्टार अमिताभ बच्चन हे त्यांच्या खोल भव्य बॅरिटोन आवाजासाठी प्रसिद्ध आहेत. संवादांव्यतिरिक्त त्यांनी अनेक गाण्यांना आपला अनोखा आवाज देखील दिला आहे. त्यापैकी एक म्हणजे 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिलसिला चित्रपटातील रंग बरसे. गाणे रिलीज होऊन 40 वर्षे झाली आहेत आणि आजपर्यंत रंग बरसे हे होळीचे आवडते गाणे आहे. सर्व श्रेय बिग बींचे दिवंगत वडील आणि दिग्गज कवी हरिवंशराय बच्चन यांना जाते. त्यांनी रंगांच्या उत्सवाभोवती आनंदी गीते लिहिली आहेत. रेखा, बिग बी, जया बच्चन आणि दिवंगत संजीव कुमार यांची गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये असलेली उपस्थिती रंग बरसेला आणखी खास बनवते.
होली के दिन:प्रख्यात गायिका लता मंगेशकर आता नाहीत पण त्यांचा अमर आवाज सण किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी नक्कीच मूड उंचावतो. शोले (1975) चित्रपटातील होली के दिन गाणे आम्हाला दिल्याबद्दल त्यांचे आणि स्वर्गीय किशोर कुमार यांचे मानावे तितके आभार कमी आहेत. अभिनेता अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या जादुई आवाजात सुंदरपणे लिप-सिंक केले आणि हे गाणे सुपर-डुपर हिट झाले जे काळाच्या कसोटीवर उभे आहे. चाळीस वर्षानंतरही या गाण्याशिवाय होळीचा सण पूर्ण होत नाही.