मुंबई - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची नात सायशा सहगल लवकरच लग्नबंधात अडकणार आहे. १० मार्चला ती दाक्षिणात्य अभिनेता आर्यासोबत विवाह करणार आहे. आर्या हा सायशापेक्षा १७ वर्षांनी मोठा आहे. 'गजनीकांत' या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. तेव्हापासून त्यांच्या नात्याच्या चर्चा सुरु होत्या.
- https://www.instagram.com/p/BqwTfQigY9I/
आर्या आणि सायशा यांचे वर्षभरापूर्वीपासूनच अफेअर सुरू झाले होते. सायशा ही अभिनेते आणि फिल्ममेकर असलेले सुमित सहगल आणि अभिनेत्री शाहीन यांची कन्या आहे.
कोण आहे 'आर्या' -
आर्या हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला नावाजलेला अभिनेता आहे. त्यासोबतच त्याचे चेन्नईत शी सेल नावाचे हॉटेलही आहे.
त्याने 'कलभा कधलन', 'माय कन्नाडी', 'सर्वम', 'राजा रानी', 'जीवा' या चित्रपटांमध्ये काम केले आहे..