मुंबई - बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांनी आपल्या अभिनयाने सिनेकारकिर्द गाजवली आहे. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलगी टीना अहुजा हिनेही अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली आहे. अलिकडेच तिचा गजेंद्र वर्मासोबत एक म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला आहे. मुलीच्या याच अल्बमच्या प्रमोशनसाठी गोविंदा त्यांची पत्नी सुनीता यांच्यासोबत विविध ठिकाणी हजेरी लावत आहे.
गोविंदा यांनी कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्येही हजेरी लावली होती. या शोमध्ये त्यांनी आपल्या करिअरबद्दल बरेच खुलासे केले आहे. त्यांच्या नावाविषयीचं गुपितही त्यांनी यावेळी उलगडा केला.
हेही वाचा -'तुफान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फरहान अख्तर जखमी