मुंबई -बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि त्याची पत्नी आणि इंटेरिअर डिझायनर असलेली गौरी खान यांची जोडी आज चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. त्यांची प्रेमकथा देखील एखाद्या चित्रपटाला साजेशी अशीच आहे. गौरीला मिळवण्यासाठी शाहरुखने बरीच मेहनत घेतली होती. आज गौरीचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात हे काही खास किस्से...
गौरीचा जन्म ८ ऑक्टोबर १९७० साली दिल्लीमध्ये झाला होता. जेव्हा शाहरुखने गौरीला पहिल्यांदा पाहिले होते, तेव्हा ती केवळ १४ वर्षांची होती. पहिल्याच नजरेत शाहरुखला तिच्यावर प्रेम झालं होतं. मात्र, गौरीसमोर प्रेमाची कबुली देण्यासाठी तो नर्व्हस व्हायचा. तीनवेळा गौरीला भेटल्यानंतर शाहरुख तिचा नंबर घेऊ शकला. होता.
हेही वाचा -२ नोव्हेंबरला शाहरुख खान पुन्हा परततोय छोट्या पडद्यावर
अशी होती पहिली भेट -