महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

राहुल गांधींच्या समर्थनार्थ उतरली अभिनेत्री गौहर खान - Rahul Gandhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात राजीव गांधींबद्दल बोचरी टीका केली होती. त्यानंतर राहुल गांधींनी त्यांना सडेतोड उत्तर दिले होते. राहुल यांच्या समर्थनार्थ अनेकजण त्यांच्या पाठीशी उभे आहेत अभिनेत्री गौहर खाननेही त्यांना पाठिंबा दर्शवलाय.

अभिनेत्री गौहर खान

By

Published : May 6, 2019, 10:32 PM IST


मुंबई - अभिनेत्री गौहर खान हिने राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ ट्विट केल्यामुळे ती चर्चेत आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल विधान केले होते. त्यावरुन बरेच वाद तयार झाले आहेत. बिग बॉस विजेत्या गौहरने या वादात ट्विट करुन आपली भूमिका मांडली आहे.

गौहरने ट्विटमध्ये लिहिलंय, ''तुमच्याबद्दल माझ्या मनांत आदर आहे. तुमचे वडील दिवंगत राजीव गांधी हे सन्माननिय पंतप्रधान होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल आकस असू शकतो. तुम्ही तुमचा सन्मान कायम राखला आहे. तुम्ही अजून मजबूत व्हा राहुल गांधी.'' असे म्हणत गौहरने केलेल्या ट्विटचे अनेक जण कौतुक करीत आहेत तर काहींनी तिला ट्रोल करायलादेखील सुरूवात केली आहे.
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी आणि काँग्रेसवर टीका करताना माजी पंतप्रधानांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. मोदी म्हणाले होते, ''तुमच्या वडिलांना राजदरबाऱ्यांनी मिस्टर क्लिन ठरवले होते. पण त्यांचा अंत भ्रष्टाचारी नंबर १ म्हणून झाला. जो अहंकार तुम्ही बाळगलाय त्याचाही अंत होईल. हा देश चुका करणाऱ्यांना माफ करेल मात्र विश्वासघात करणाऱ्यांना नाही.''

मोदी यांच्या विधानानंतर राहुल गांधींनी ट्विट करीत जबरदस्त जवाब दिला होता. राहुल गांधींनी लिहिले, ''मोदीजी तुमची लढाई संपली. तुमच कर्म तुमची वाट पाहात आहे. स्वतःचे विचार माझ्या वडीलांवर लादणं तुम्हाला वाचवू शकणार नाही.''

राहुल गांधींनी असे सडेतोड आणि संयमी उत्तर दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ अनेक जण बोलू लागले आहे. बॉलिवूडमधील अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शवलाय. काही दिवसापूर्वी फराह खानने ट्विट करुन राहुल गांधीचे समर्थन केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details