मुंबई -यंदा सलग एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणारा अक्षय कुमार वर्षाच्या अखेरीसही 'गुड न्यूज' घेऊन आला आहे. अक्षय कुमार, करिना कपूर खान, किआरा आडवाणी, दलजीत दोसांझ अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'गुड न्यूज'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अलिकडेच अक्षय कुमारचा 'हाऊसफूल ४' हा चित्रटही धुमाकूळ घालत आहे. आता 'गुड न्यूज' देखीलमध्येही त्याची धमाल कॉमेडी पाहायला मिळते.
'गुड न्यूज' चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर अक्षय आणि करिनाची जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच हा चित्रपट चर्चेत होता. त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरविषयी चाहत्यांना उत्सुकता होती. गरोदरपणाच्या गोंधळामध्ये अक्षय आणि करिनाची कशी त्रेधा तिरपट उडते, याची धमाल झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
हेही वाचा -सावित्रीबाई मालुसरेंच्या करारी भूमिकेत झळकणार काजोल