मुंबई -अभिनेता अक्षय कुमार, करिना कपूर, कियारा आडवाणी आणि दलजीत दोसांझ यांची मुख्य भूमिका असलेल्या 'गुडन्यूज' चित्रपटाने १ जानेवारीला १०० कोटींचा आकडा पार केला. अक्षय कुमारचा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला हा चौथा चित्रपट होता. सलग चौथ्या चित्रपटानेही १०० कोटींचा आकडा पार करत त्याच्यासाठी नववर्षाची चांगली सुरुवात करून दिली आहे.
पहिल्याच दिवशी 'गुडन्यूज' चित्रपटाने २२.५९ कोटीची कमाई केली होती. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सलमान खानचा 'दबंग ३' चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांमध्ये चांगलीच शर्यत रंगली होती.
हेही वाचा -नववर्षात फरहान अख्तरची नवी इनिंग, पाहा फोटो
'गुडन्यूज'चे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे. विशेष म्हणजे, हा त्यांचा पहिलाच दिग्दर्शनीय चित्रपट होता. अक्षयने आत्तापर्यंत तब्बल २१ पदार्पणीय दिग्दर्शकासोबत काम केले आहे.