पुणे - तरुणाईमध्ये सोशल मीडियाची क्रेझ दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली पाहायला मिळते. यातही 'टिकटॉक व्हिडिओ' क्रेझ मोठी आहे. बऱ्याच जणांना आपले टिकटॉक व्हिडिओ व्हायरल व्हावेत, असे वाटते. त्यासाठी ते कुठेही हे व्हिडिओ तयार करताना दिसतात. सध्या अशाच एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या तरुणीने चक्क धावती पीएमपी बस थांबवून या गाडीसमोर डान्स केला आहे.
'चलो इश्क लडाये' या गाण्यावर तिने हा व्हिडिओ तयार केला आहे. हडपसर, गाडीतळ येथील हा व्हिडिओ असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. या तरुणीने भेकराईला जाणारी पीएमपी बस अडवली आणि तिच्यासमोर डान्स केला. पीएमपीच्या चालकाला सुरुवातीला हा प्रकार काय आहे, ते समजलेच नाही. मात्र, जेव्हा ही तरुणी त्याला नाचताना दिसली तेव्हा तो पाहतच राहिला. या बसमध्ये इतरही प्रवासी होते.