महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ग्रामीण भागातील समाजजीवन प्रकट करणारा "घुसाडी" प्रेक्षकांच्या भेटीला - Ghusadi movielatest news

ग्रामीण भागात उंदीर घुशी पकडणारा एक समाज आहे. त्याचे जगणे, त्यांची व्थ घुसाडी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. भाऊ कदम या चित्रपटात वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळेल. या चित्रपटातील धनेश पाटील या कलाकाराने चित्रपटाविषयी माहिती दिली आहे.

"घुसाडी" प्रेक्षकांच्या भेटीला

By

Published : Nov 11, 2019, 9:32 AM IST

दुर्गम भागातील आदिवासी समाजाच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकणारा "घुसाडी" हा मराठी चित्रपट येतोय. येत्या 15 नोव्हेंबर रोजी सर्वत्र रिलीज होतोय. सामाजिक संदेश देणाऱ्या या चित्रपटात बहुचर्चित विनोदी कलाकार भाऊ कदम यांची मामाची भूमिका आहे. हा मामा (भाऊ कदम) हा आपल्या दोन भाच्यांसोबत भात पिकाच्या साठवणुकीच्या खळ्यावर अथवा शेताच्या बांधावर पडलेल्या बिळात राहत असलेल्या घुशी काढण्याचे काम करीत असतो. या घुशी भात पिकाचे दाणे फस्त करीत असतत. या घुशींचा उच्छाद थांबविण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी गावातीलच किंवा परिसरात राहत असलेली आणि जमेल ते काम करण्यासाठी पुढे येणारी लोकांना बोलविले जाते. त्यांना घुसाडी असे संबोधले जाऊन त्याच नावाने हा चित्रपट बनविला असल्याचे दिग्दर्शक प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले.

"घुसाडी" प्रेक्षकांच्या भेटीला

प्रफुल्ल पाटील पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील सांगे-नाणे गावातील आहेत. ग्रामीण भागातील कलाकारांना वाव मिळावा म्हणून जव्हार,वाडा आणि भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील कलाकार त्यांनी निवडले आहे.

"घुसाडी" प्रेक्षकांच्या भेटीला

या चित्रपटातील प्रमुख नायक जव्हार भागातील आहे. तर वाडा तालुक्यातील नाणे गावातील दोन्ही हाताने अपंगत्व असलेले धनेश गणपत पाटील हे 'पांगा' हे पाञ साकारत आहेत. धनेश यांच्यामते या चित्रपटातील घुसाडी हे म्हणजे आदिवासी समाजातील सर्वात मागास असलेले लोकं अंगावर कपडे फाटलेले, वितभर पोट भरण्यासाठी पडेल ते काम करणारे आणि शेत जमिनीच्या बांधावर घुशी पकडणारे लोक म्हणून नायकाची भूमिका असलेला बांगो आणि पांगा आणि या भूमिका साकारत आहेत.

धनेश पाटील हे जरी दोन्ही अपंग असले तरी ते जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर व्यक्तीगत घरातील कामे ही सफाईदारपणे करताना दिसतात. मोबाईल वापर,चारचाकी, दुचाकी चालवत असल्याचे माहीती देतात. माझ्या सारख्या अपंग व्यक्ती करू सर्व काही करू शकतो तर इतर व्यक्ती का नाही करू शकत, असा सवाल ते उपस्थित करताना दिसतात.

या चित्रपटात त्यांची भुमिका ही घरातील सर्व कामे करत असताना चिञपटातील नायकाच्या भूमिकेतील भाऊ असलेला बांगो आणि मामा (भाऊ कदम ) यांच्या जोडीला घुशी पकडण्याचे कामे करताना दाखविण्यात आले आहे.

एकदा या चित्रपटात एका सीनचा चित्रीकरणात भाऊ कदम हे घुशी पकडत असताना ते खोलवर बिळात हात घालत तेव्हा त्यांना घुशी ऐवजी चक्क साप हातात काढल्याचा किस्सा धनेश पाटील सांगतात. हा खराखुरा शॉट चित्रपटात आहे. भाऊ कदम यांच्याकडून आमच्या सारख्या नवोदित कलाकारांना बरेच काही शिकायला मिळाल्याचे कलाकार सांगतात.

अन्नाला आणि पाण्याला जात नसते माणुसकी ही सर्वश्रेष्ठ असल्याचा सामाजिक संदेशही या घुसाडी चित्रपटाच्या माध्यमातून धनेश पाटील देत आहेत.

धनेश पाटील सारखी व्यक्तीरेखा पाहून अपंगत्व असलेल्यांना जिद्द आणि चिकाटीचे निश्चितच उर्जेचे बळ देते.

ABOUT THE AUTHOR

...view details