मुंबई - अभिनेत्री गौहर खानने बिग बॉसचा सातवा सिझन जिंकल्यानंतर देशभर प्रसिध्दी मिळवली होती आणि मीडियामध्ये चर्चेतही होती. यानंतर तिने अनेक रियालिटी शो होस्ट केले. अलीकडेच गौहर खान बिग बॉसच्या 14 व्या सिझनमध्ये सिनीयर म्हणून दिसली होती. बिग बॉसमध्ये तिने काही ज्यूनियर्सना बऱ्याच आज्ञाही दिल्या होत्या. मात्र, आता गौहर खान घराबाहेर पडली आहे. अलीकडेच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गौहर खान बीचवर आरामात चहा घेताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे.
समुद्रावर भटकताना गौहर खानचा व्हिडिओ व्हायरल - गौहर खानचा व्हिडिओ झाला व्हायरल
अभिनेत्री गौहर खान समुद्रावर बीचचा आनंद घेत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत तिच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे.
अभिनेत्री गौहर खान
या व्हिडिओमध्ये, गौहर खान जबरदस्त स्टाईलमध्ये फिरत असताना चहाचा आस्वाद घेत आहे. गौहर खानच्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख १९ हजाराहून अधिक व्हूज मिळाले आहेत. तिच्या या व्हिडिओवर चाहते बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत.