"काहे दिया परदेस" या मराठी मालिकेतून घरा घरात पोहचलेली अभिनेत्री सायली संजीव हिच्या नाशिकच्या घरी पर्यावरण पूरक बाप्पाची स्थापना करण्यात आली. गेल्या पाच वर्षांनं पासून सायली स्वतः नाशिकला येऊन घरात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करत असते.
अभिनेत्री सायली संजीवच्या घरचा गणेशोत्सव - Echofreindly Ganesh
अभिनेत्री सायली संजीवच्या नाशिक येथील घरी बाप्पाचे आगमन झालंय. पर्वावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर तिचा भर असतो. तिने आमच्या प्रतिनिधीशी बातचीत केली.
दरवर्षी प्रमाणे सायलीने शाडू मातीच्या सुबक गणेश मूर्तीची स्थापना करून विटांचे पर्यावरण पूरक देखावा साकारला आहे. गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठना करते. वेळी पुरुषांची असलेली यातील मक्तेदारी मोडीत काढत सायली गेल्या पाच वर्षांपासून नकळत स्त्री पुरुष समानतेचा संदेश देत असते...सायलीच्या घरी गणपती बाप्पा सोबतच मंगळागौरी देखील विराजमान होतं असल्याने या दिवसात भक्तीमय वातावरण असल्याचे तिने सांगितलं आहे. तसेच सायलीचे येत्या वर्षात आणि पुढील वर्षात सातारचा सलमान आणि आटपाडी नाईटस हे चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे तिने सांगितलं...