मुंबई- 'गेम ऑफ थ्रोन्स' मालिकेला नेहमीच प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असतो. प्रेक्षकांची मिळणारी हीच पसंती पाहता आता या मालिकेचा आठवा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या आठव्या भागाचा रंजक ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
'गेम ऑफ थ्रोन्स'च्या शेवटच्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित - season 8
रहस्य आणि गूढ यांचा समावेश असलेला हा रंजक ट्रेलर प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे. यावेळची ही मालिका ६ भागांची असणार आहे.
रहस्य आणि गूढ यांचा समावेश असलेला हा रंजक ट्रेलर प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे. यावेळची ही मालिका ६ भागांची असणार आहे. १४ एप्रिलला मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'गेम ऑफ थ्रोन्स' ही लोकप्रिय मालिका जॉर्ज आर. आर. मार्टिन यांच्या कादंबरीवर आधारित आहे. एचबीओ वरचा हा सर्वाधिक लोकप्रिय शो आहे.
'गेम ऑफ थ्रोन्स'चा हा आठवा आणि अखेरचा सीझन असणार आहे. २०१७ मध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा ७ वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. निश्चित या शोच्या चाहत्यांसाठी हा शेवटचा सीझन अधिक खास ठरणार आहे. त्यामुळे, प्रेक्षकही या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.