महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रजनीकांत यांच्या सिने कारकिर्दीला 45 वर्षे पूर्ण; ए. आर.रहमान यांनी शेअर केले विशेष पोस्टर - मुंबई लेटेस्ट न्यूज

संगीतकार ए.आर. रहमान यांनी रजनीकांत यांना शुभेच्छा देण्यासाठी तयार केलेल्या पोस्टरमध्ये रजनीकांत यांच्या गाजलेल्या भूमिकांची छायाचित्रे वापरण्यात आली आहेत. 2020 मध्ये आलेल्या दरबार चित्रपटातील काही दृश्य पोस्टवर रेखाटण्यात आलेली आहेत.

Rajnikanth
रजनीकांत

By

Published : Aug 10, 2020, 10:36 AM IST

मुंबई-सिनेअभिनेते दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार रजनीकांत यांच्या कारकिर्दीला 45 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महान संगीतकार ए. आर. रहमान यांनी एक विशेष पोस्टर प्रकाशित केले. त्यांनी हे पोस्टर त्यांच्या ट्विटरवर शेअर केले आहे.

संगीतकार ए.आर. रहमान यांनी रजनीकांत यांना शुभेच्छा देण्यासाठी तयार केलेल्या पोस्टरमध्ये रजनीकांत यांच्या गाजलेल्या भूमिकांची छायाचित्रे वापरण्यात आली आहेत. 2020 मध्ये आलेल्या दरबार चित्रपटातील काही दृश्य पोस्टवर रेखाटण्यात आलेली आहेत. रजनीकांत यांच्या रोबोट चित्रपटातील चित्ती भूमिकेचं चित्रदेखील दिसून येते.
या पोस्टरमध्ये डोंगरावर चढणाऱ्या लोकांचा कळप दिसतो.पोस्टरमधून रजनीकांत यांचा 45 वर्षांचा प्रवास दिसतो. या काळात त्यांनी स्क्रीनवर अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या.

रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. त्यांनी तमिळ आणि बॉलिवूड सिनेमात काम केले आहे. अभिनयाबरोबरच त्यांनी निर्माता आणि पटकथा लेखक म्हणूनही काम केले आहे. त्यांना 45 वर्षाच्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2014 च्या भारतीय 45 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रजनीकांत यांना 'भारतीय चित्रपटातील शतकातील नायक' हा पुरस्कार देण्यात आला.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 2019 च्या 50 व्या पुरस्कार सोहळ्यात रजनीकांत यांना आयकॉन ऑफ ग्लोबल ज्युबिली पुरस्काराने गौरविण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details