१. कादर खान
२०१९ च्या सुरूवातीलाच म्हणजे १ जानेवारी रोजी एक दुःखद बातमी भारतात येऊन धडकली. ही बातमी होती बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता कादर खान यांच्या निधनाची. त्यांचा मुलगा सरफराजने या बातमीला दुजोरा दिला आणि संपूर्ण बॉलिवूड जगतावर शोककळा पसरली. कॅनडातील रुग्णालयात कादर खान यांनी अखेरचा श्वास घेतला.
२. राजकुमार बडजात्या
हिंदी चित्रपट निर्माता राजकुमार बडजात्या यांचे २१ फेब्रुवारी निधन झाले. राजश्री प्रॉडक्शनच्या वतीने 'हम आपके हैं कौन', 'मैंने प्यार किया', 'हम साथ साथ हैं', 'विवाह' आणि 'प्रेम रतन धन पायो' यासारख्या असंख्य चित्रपटांची निर्मिती बडजात्या यांनी केली होती.
हेही वाचा -२०१९ मध्ये प्रेक्षकांवर प्रभाव टाकलेले मराठी चित्रपट
३. वीरु देवगण
अजय देवगणचे वडील आणि हिंदी चित्रपटाचे अॅक्शन मास्टर वीरु देवगण यांनी २७ मे रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी 'सत्ते पे सत्ता', 'स्वर्ग से सुंदर', 'दस नंबरी', 'मिस्टर नटवरलाल', 'क्रांति', 'राम तेरी गंगा मैली', 'आखिरी रास्ता', 'मिस्टर इंडिया', 'फूल और कांटे', 'इश्क' यासारख्या ८० चित्रपटांची अॅक्शन कोरिओग्राफी केली. १९९९ मध्ये त्यांनी निर्माता दिग्दर्शक म्हणून 'हिंदुस्तान की कसम' हा चित्रपट बनवला होता.
४. गिरीश रघुनाथ कर्नाड
प्रसिद्ध अभिनेता, फिल्म निर्माता आणि नाटककार गिरीश रघुनाथ कर्नाड यांचे १० जून २०१९ रोजी निधन झाले. त्यांनी १९७० मध्ये त्यांनी 'संस्कार' या कन्नड चित्रपटातून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांच्या या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रपतींचा गोल्डन लोटस पुरस्कार मिळाला. हिंदीमध्ये त्यांनी 'निशांत' (1975), 'मंथन' (1976) और 'पुकार' (2000) यासारखे दर्जेदार चित्रपट केले. त्यानंतर 'इकबाल' (2005), 'डोर' (2006), '8x10 तस्वीर' (2009) आणि 'आशाएं' (2010) अशा गाजलेल्या चित्रपटातूनही काम केले. याशिवाय सलमान खानच्या 'एक था टायगर' (2012) आणि 'टायगर ज़िंदा है' (2017) या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. 'टायगर ज़िंदा है' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
५. शिवलेख सिंग
या यादीमध्ये सर्वाच चटका लावणारी एक्झीट बालकलाकार शिवलेख सिंग याची होती. १९ जुलैला एका रस्ता अपघातात त्याचे निधन झाले. शिवलेखने 'ससुराल सिमर का' सहीत अनेक टीव्ही मालिकांमधून काम केले. तसेच 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज', 'संकटमोचन हनुमान', 'खिड़की', 'बालवीर', 'श्रीमान जी श्रीमती जी', 'अकबर-बीरबल' या टीव्ही शोमध्येही त्याने काम केले.
६. विद्या सिन्हा
हिंदी चित्रपटाची नामवंत अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे १५ ऑगस्ट रोजीी वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. त्यांना ह्रदयरोगाचा त्रास होता. 'कुल्फी कुमार बाजेवाला' या टीव्ही मालिकेत त्या शेवटच्या दिसल्या. यात त्यांनी सिकंदरच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांनी 'छोटी सी बात', 'रजनीगंधा', 'पति, पत्नी और वो' यासारख्या चित्रपटातून भूमिका केल्या होत्या बॉडिगार्ड या २०११ मध्ये आलेल्या चित्रपटात त्या शेवटच्या दिसल्या होत्या.