मुंबई -बॉलिवूडचा चार्मिंग स्टार टायगर श्रॉफ त्याच्या फिटनेसमुळे लोकप्रिय आहे. त्याच्या फिटनेसची तरुणाईमध्ये क्रेझ पाहायला मिळते. या फिटनेससाठी टायगर खूप मेहनत घेतो. त्याचा एक व्हिडिओ पाहुन त्याच्या फिटनेसचे गुपीत तर तुम्हाला कळेल. सोबतच हा व्हिडिओ पाहुन तुम्हीही थक्क व्हाल..
टायगरचा फिटनेस फंडा पाहुन तुम्हीही व्हाल थक्क, पाहा व्हिडिओ - वॉर
टायगरच्या या व्हिडिओवर आत्तापर्यंत ५२००० पेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत.
टायगरचा फिटनेस फंडा पाहुन तुम्हीही व्हाल थक्क
टायगरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो तब्बल २०० किलो वजन उचलताना दिसतो. टायगरच्या या व्हिडिओवर आत्तापर्यंत ५२००० पेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत.
टायगर त्याच्या आगामी 'बागी ३' साठी कठीण परिश्रम घेताना दिसतो. तसेच हृतिक रोशनसोबतही तो 'वॉर' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री वाणी कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.