मुंबई- सैराट चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता रिंकू राजगुरू लवकरच आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कागर' असं या चित्रपटाचं शीर्षक असून काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सिनेमाबद्दलची उत्कंठा वाढवणाऱ्या या टीझरनंतर आता चित्रपटातील पहिलं गाणंही प्रदर्शित करण्यात आलं आहे.
'लागलीया गोडी तुझी'! 'कागर'मधील पहिलं गाणं प्रदर्शित - lagliya godi tuzi
'लागलीया गोडी तुझी' असं या गाण्याचं शीर्षक आहे. चित्रपटातील या गाण्यात दोन प्रेमवीरांची प्रेमकथा पाहायला मिळत आहे. सैराटप्रमाणेच रिंकूच्या त्याच बिनदास्त अंदाजाची झलक प्रेक्षकांना या गाण्यातही पाहायला मिळते
'लागलीया गोडी तुझी' असं या गाण्याचं शीर्षक आहे. चित्रपटातील या गाण्यात दोन प्रेमवीरांची प्रेमकथा पाहायला मिळत आहे. सैराटप्रमाणेच रिंकूच्या त्याच बिनदास्त अंदाजाची झलक प्रेक्षकांना या गाण्यातही पाहायला मिळते. प्रेमगीत असलेल्या या गाण्याचे लेखन आणि संगीत दिग्दर्शन ए.व्ही.प्रफुल्लचंद्र यांनी केले आहे, तर शशा तिरुपती आणि हर्षवर्धन वावरे यांनी हे गाणे गायले आहे.
येत्या २६ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. 'कागर' या शब्दाचा अर्थ आहे उत्तुंग भरारी घेण्यासाठी आसुसलेल्या पक्ष्याचे नाजुक पंख. तारूण्यात बहरत जाणाऱ्या प्रेमापासून रिंकूच्या राजकारणातील प्रवेशापर्यंत होणाऱ्या बदलांची कथा चित्रपटाच्या टीझरमध्ये पाहायला मिळाली होती. याच कथेतून आता आर्ची पुन्हा एकदा महाराष्ट्रभरातील प्रेक्षकांची मने जिंकते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.