मुंबई - लहानपणी आंधळी कोशिंबीर हा खेळ सर्वच खेळले असणार. त्या खेळामुळे दृष्टिहीन झाल्यावर काय वाटते याचे ज्ञान मिळे व आंधळ्यांप्रती आदर वाढे. हे सांगायचं कारण असे की एक मराठी चित्रपट ‘दृष्टांत’ बनलाय ज्यात सर्वच कलाकार व संगीत दिग्दर्शक व गायक दृष्टिहीन आहेत. हा जागतिक विक्रम आहे कारण दृष्टांत हा पहिला मराठी चित्रपट आहे, ज्यामध्ये सर्व दृष्टिहीन कलाकारांनी काम केले आहे. ‘दृष्टांत’ मराठी तसेच भारतीय चित्रपटांची परिभाषा बदलताना दिसेल. चित्रपटाच्या निर्मात्यांनी गायन, संगीतकार आणि डबिंग यासाठी दृष्टिहीन कलाकारांना संधी दिली आहे.
अभिजित के झांजल दिग्दर्शित 'दृष्टांत' हा चित्रपट इच्छुक दृष्टिहीन कलाकार आणि लोकांसाठी प्रेरणादायी आहे, त्यामुळे सामान्य लोकांना दृष्टिहीन जगाला चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल. हा चित्रपट बनवण्या मागचा मुख्य उद्देश असा आहे की सर्वसामान्य लोकांचा दृष्टिहीन लोकांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे आणि तसेच अवयव दान करून त्या व्यक्तींना मदत करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. ‘दृष्टांत’ सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम वेगात सुरु आहे.
सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण गोव्यामध्ये झाले असून, मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा कलाकार अजिंक्य याच्या भोवती चित्रपटाची मुख्य कथा आधारित आहे. या चित्रपटात बबिता, रतन आणि योगेश राव या कलाकारांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. वेगळ्या वाटेवरचा ‘दृष्टांत’ प्रेक्षकांना भारावून टाकेल यात शंका नाही.
बीएम प्रॉडक्शन्स आणि पोलराइड मीडिया निर्मित, त्रिपुर सिंग, तन्मय तेलंग आणि हर्षवर्धन हे चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट दृष्टिहीन आणि बहिऱ्या व्यक्तींना बघता आणि ऐकता येईल याची विशेष काळजी घेतली आहे.
‘दृष्टांत’ या मराठी चित्रपटाची ‘आंधळी कोशिंबीर’! - Marathi film 'Drishtant'
‘दृष्टांत’ हा पहिला चित्रपट आहे ज्यातील सर्वच कलाकार व संगीत दिग्दर्शक व गायक दृष्टिहीन आहेत. हा जागतिक विक्रम आहे कारण दृष्टांत हा पहिला मराठी चित्रपट आहे, ज्यामध्ये सर्व दृष्टिहीन कलाकारांनी काम केले आहे. ‘दृष्टांत’ भारतीय चित्रपटांची परिभाषा बदलताना दिसेल.
‘दृष्टांत’