मुंबई - अभिनेत्री राणी मुखर्जीच्या 'मर्दानी' चित्रपटाच्या यशानंतर आता 'मर्दानी २' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातही राणीची पोलिसाच्या भूमिकेतील दमदार झलक पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
'मर्दानी २'चं दिग्दर्शन गोपी पुथरन हे करत आहेत. तर, आदित्य चोप्रा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. १३ डिसेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे.
टीझरसोबतच 'मर्दानी २' चित्रपटाचं फर्स्ट पोस्टरही शेअर करण्यात आलं आहे. यामध्ये राणीचा करारी लूक पाहायला मिळतो.
हेही वाचा -सईचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, फर्स्ट लूक प्रदर्शित
अवघ्या ३८ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये राणीची दमदार भूमिका पाहायला मिळते. 'गुन्हेगार जोपर्यंत गुन्हा करणं थांबवत नाहीत, तोपर्यंत मर्दानी थांबणार नाही', अश्या ओळी या टीझरमध्ये पाहायला मिळतात. महिलांवरील अत्याचारावर हा चित्रपट भाष्य करतो.
हेही वाचा -विकी कौशलचा भाऊ सनी 'या' चित्रपटात मुख्य भूमिकेत, पोस्टर प्रदर्शित
'हिचकी' चित्रपटानंतर राणीच्या चित्रपटाची आतुरता होती. यश राज फिल्म्सच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे 'मर्दानी २'लाही पहिल्या चित्रपटाप्रमाणेच चांगला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा -जेनेलियाला सोडून मैत्रिणीशी बोलत होता रितेश... पाहा 'अशी' दिली रिअॅक्शन