महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

संजय लीला भन्साळींच्या 'मन बैरागी'चं पोस्टर प्रदर्शित, मोदींवर असणार बायोपिक - akshay kumar news

भिनेता अक्षय कुमारने हे पोस्टर त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलं आहे. या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन त्याने पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

संजय लीला भन्साळींच्या 'मन बैरागी'चं पोस्टर प्रदर्शित, मोदींवर आधारित असणार चित्रपट

By

Published : Sep 17, 2019, 12:30 PM IST

मुंबई -बॉलिवूडचे आघाडीचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर चित्रपट तयार करत आहेत. 'मन बैरागी' असं या चित्रपटाचं नाव आहे. आज पंतप्रधान मोदींच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं आहे. अभिनेता अक्षय कुमारने हे पोस्टर त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम मोदी' हा बायोपिक काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अभिनेता विवेक ओबेरॉयने या चित्रपटात मोदींची भूमिका साकारली होती. मात्र, आता संजय लीला भन्साळी हे देखील त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करत आहेत.

हेही वाचा-पंतप्रधान मोदींच्या जीवनावर चित्रपट साकारणार संजय लीला भन्साळी

हा चित्रपट बनवण्याचा उद्देश म्हणजे, मोदींचे आयुष्य हे सार्वभौमिक अपिल आणि एक विशेष संदेश देणारे आहे. त्यामुळे हा चित्रपट तयार करणार असल्याचं भन्साळींनी सांगितलं. हा चित्रपट केवळ एकाच तासाचा असणार आहे.

हेही वाचा-HBD PM MODI : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 69 वा वाढदिवस, आईंचा घेणार आशीर्वाद

अक्षयने या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details