मुंबई - सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख आणि तारा सुतारिया यांची मुख्य भूमिका असलेला 'मरजावां' हा चित्रपट सिनेमागृहात झळकला आहे. १५ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला. अॅक्शन तसेच रोमान्सने भरलेल्या या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या कमाईचे आकडे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहिल्याच दिवशी ७.०३ कोटी इतकी कमाई करून चित्रपटाची चांगली सुरुवात झाली आहे. २ हजार ९२२ स्क्रिन्सवर हा चित्रपट झळकला आहे. त्यानुसार, ही कमाई चांगली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -Marjavaan Public Review: रितेशच्या अभिनयाची प्रेक्षकांवर जादू, पाहा प्रतीक्रिया