महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

एनडी स्टुडिओला भीषण आग, जोधा-अकबर चित्रपटाचा सेट जळाला - जोधा अकबर चित्रपटाचा सेट जळाला

रायगडमधील कर्जत येथे नितीन देसाई यांचा एन. डी. स्टुडिओ आहे. या ठिकाणी अनेक सुप्रसिद्ध हिंदी आणि मराठी सिनेमाचे सेट आहेत. या स्टुडिओला शुक्रवारी दुपारी आग लागली. यात जोधा अकबर चित्रपटासाठी उभारण्यात आलेला सेटचा काही भाग जळाला आहे.

fire-broke-out-at-nd-studio-in-maharashtra-set-of-film-jodha-akbar-burnt
एनडी स्टुडिओला भीषण आग, जोधा-अकबर चित्रपटाचा सेट जळाला

By

Published : May 9, 2021, 7:54 PM IST

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या कर्जतमधील स्टुडिओला भीषण आग लागली. या आगीत 'जोधा अकबर' या चित्रपटासाठी उभारण्यात आलेला किल्ल्याचा सेट काही प्रमाणात जळाला आहे.

रायगडमधील कर्जत येथे नितीन देसाई यांचा एन. डी. स्टुडिओ आहे. या ठिकाणी अनेक सुप्रसिद्ध हिंदी आणि मराठी सिनेमाचे सेट आहेत. या स्टुडिओला शुक्रवारी दुपारी आग लागली. यात जोधा अकबर चित्रपटासाठी उभारण्यात आलेला सेटचा काही भाग जळाला आहे.

एनडी स्टुडिओला भीषण आग....

दरम्यान, स्टुडिओच्या मागील बाजूला असणाऱ्या जंगल परिसरामध्ये वणवा पेटला होता. त्याची वेळीच दखल न घेतल्याने स्टुडिओच्या आतील भागातील गवत जळत जोधा अकबर चित्रपटासाठी बनवलेल्या किल्ल्याच्या सेटपर्यंत आग पोहोचली. यामध्ये कोणत्याही जीवितहानी झाली नाही. तसेच या आगीत एकूण नुकसान किती झालं यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

हेही वाचा -‘स्टील फोटोग्राफर’ सुधाकर मुणगेकर यांचे निधन!

हेही वाचा -मदर्स डेच्या दिवशी अभिनेत्री सुष्मिता सेनचा भावपूर्ण संदेश

ABOUT THE AUTHOR

...view details