महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

उर्मिला मातोंडकरबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल - Pune police

काँग्रेसच्या मुंबईतील लोकसभेच्या उमेद्वार उर्मिला मातोंडकर यांच्या विरोधात अश्लिल पोस्ट लिहिणाऱ्याच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल झालाय. आरोपी धनंजय कुडतरकर हा पुण्यातील बुधवार पेठेत राहतो. त्याचे फेसबुक चाळलं असता तो भाजपचा कट्टर समर्थक असल्याचं दिसून येते.

आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

By

Published : May 27, 2019, 10:48 PM IST

Updated : May 27, 2019, 11:35 PM IST


प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरोधात अखेर पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय कुडतरकर असे या इसमाचे नाव आहे. माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

अश्लिल पोस्ट लिहिणाऱ्याच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

आरोपी धनंजय कुडतरकर हा पुण्यातील बुधवार पेठेत राहतो. त्याच फेसबुक चाळलं असता तो भाजपचा कट्टर समर्थक असल्याचं दिसून येते. आतापर्यंत त्याने अनेक राजकीय नेत्यांच्या नावाने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे उघड झाले आहे. त्यात सोनिया गांधी ते शरद पवार यांचा समावेश आहे.

काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांच्याबद्दलही त्याने फेसबुकवर अश्लील पोस्ट केली होती. तेव्हा पुण्यातील मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी विश्रामबाग पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर आज त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Last Updated : May 27, 2019, 11:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details