महाराष्ट्र

maharashtra

ईसाई धर्मीयांच्या भावना दुखावल्याप्रकरणी फराह खान, रवीना टंडन, भारती यांच्याविरोधात तक्रार दाखल

By

Published : Dec 26, 2019, 8:07 PM IST

एका कार्यक्रमादरम्यान, ईसाई धर्माबद्दल काही शब्द उच्चारल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ख्रिसमसच्या दिवशी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता.

FIR against Raveena, Farah and bharti singh for hurting sentiments of Christian community
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी फराह खान, रवीना टंडन, भारती यांच्याविरोधात तक्रार दाखल

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन, कॉमेडी क्विन भारती सिंग आणि चित्रपट निर्माती, कोरिओग्राफर फराह खान यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ईसाई समुदायाकडून पंजाबच्या अमृतसर येथे ही तक्रार करण्यात आली आहे.

एका कार्यक्रमादरम्यान, ईसाई धर्माबद्दल काही शब्द उच्चारल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ख्रिसमसच्या दिवशी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता.

डीएसपी सोहन सिंग यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की 'आम्हाला रवीना टंडन, फराह खान आणि भारती सिंग यांच्याविरोधात तक्रार मिळाली. या तक्रारीत त्यांनी ईसाई धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, असे म्हटले आहे.

हेही वाचा -बॉलिवूडकरांचं ख्रिसमस सेलिब्रेशन, पाहा फोटो

या प्रकरणी या त्यांच्या विरोधात कलम २९५ - अ अंतर्गत केस दाखल केली आहे. एसएसपी विक्रम जीत दुग्गल यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ईसाई संघटनेद्वारे करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की 'फराह खानने कॉमेडियन भारती सिंग आणि रवीनाला इंग्रजी शब्द लिहण्यास सांगितले होते. दोघींनी ब्लॅकबोर्डवर या शब्दाचे स्पेलिंग लिहिले. हा शब्द पवित्र बायबलमधून घेतला गेला आहे. रवीनाने स्पेलिंग बरोबर लिहिले होते. मात्र, भारतीने चुकीचे लिहिले होते. तिला या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता. तरीही तिने या शब्दाची खिल्ली उडवली. तिच्या या खिल्लीमध्ये फराह आणि रवीनादेखील सहभागी झाल्या होत्या'. ईसाई समुदायाकडून या तिघींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा -वरुण धवन - नोरा फतेहीची हॉट केमेस्ट्री, 'स्ट्रीट डान्सर'चं बोल्ड गाणं पाहिलं का?

ABOUT THE AUTHOR

...view details