मुंबई- हैदराबाद येथे पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर अत्याचार करून नंतर हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्यावी, या मागणीसाठी अनेक शहरांमध्ये आंदोलने करण्यात येत आहेत. मात्र, एका चित्रपट निर्मात्याने खळबळजनक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात महिलांनी बलात्कारासाठी सहकार्य करण्याचा सल्ला त्याने दिला आहे. डेनियल श्रवण असे त्या चित्रपट निर्मात्याचे नाव आहे.
हेही वाचा -हैदराबाद महिला डॉक्टर अत्याचार व हत्या प्रकरण; सुनावणीसाठी विशेष न्यायालयाची स्थापना